Tuesday, September 29, 2015

# शाळेचे नाव : जिल्हा परिषद केंद्रशाळा, भालेर ता., जि. नंदूरबार

# गावाबद्दल थोडक्यात - भालेर गाव हे तीन गावे मिळून वसलेले आहे. भालेर गावाला बसचा थांबा असून ३ रस्त्यांना तीन गावे आहेत. १. भालेर २. नगाव ३. तिसी , यातील तिसी हे रेल्वे स्टेशन आहे. भालेर नगाव व तिसी या दोन शाळा एकाच परिसरात आहेत. भालेर हे सपाटीवरील गाव आहे. ४००० लोकसंख्येचे गाव आहे. शेतजमीन काळी कसदार आहे.

# शाळेची स्थापना - ११ जुलै १९०५

# शाळेचे ब्रीद - सत्यमेव जयते

# माजी विद्यार्थी - शिक्षक, प्रगतीशील शेतकरी, उद्योजक

# शाळेत राबवले जाणारे उपक्रम -

१. सुंदर परिसर, सुंदर शाळा
२. आदर्श परिपाठ
३. दिनांकानुसार पाढा
४. रोजचे स्पेलिंग
५. सामान्यज्ञानावर आधारित रोज एक प्रश्न
६. कथेचे सादरीकरण
७. चित्रकला स्पर्धा
८. रांगोळी स्पर्धा
९. क्रीडा स्पर्धा
१०. सांस्कृतिक स्पर्धा
११. महिला मेळावा
१२. हळदी कुंकू स्वतंत्र कार्यक्रम
१३. किशोरी मेळावा
१४. बाल आनंद मेळावा, खाद्य पदार्थांचे गाळे
१५. वृक्षारोपण/वृक्षसंवर्धन
१६. हातधुवा मोहीम

# शाळेची पटसंख्या - इ. १ ली - १५, इ. २ री - १६, इ. ३री - ३१, इ. ४थी - २०, एकूण - ८२

# शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमाप्रमाणे, शाळेत नवागतांचे भेट वस्तू देऊन स्वागत

# शाळेचा यु डायस - २७०१०१०८४०१

# शाळेचा इमेल - zppribhaler@gmail.com

# प्रवेश फी - निःशुल्क

# खेळाचे मैदान - आहे, खेळाचे साहित्य आहे.

# शाळेची यशोगाथा -

१. मुलांसाठी स्वतंत्र शौचालय - स्वच्छतागृह
२. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
३. पिण्यासाठी शुद्ध पाणी - जलमणी योजना
४. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
५. मध्यान्ह भोजन शिस्तीने
६. हात धुण्याची प्रत्येकाला सवय
७. वृक्षसंवर्धनाचे संस्कार
८. क्रीडास्पर्धेत यश
९. २०१३-१४ - शिष्यवृत्ती १००% निकाल
१०. शिक्षकांच्या वक्तशीर पणामुळे पालकात तालुक्याला कौतुक
११. सांस्कृतिक कार्यक्रमात १००% विद्यार्थी सहभाग
१२. शाळा-परिसर स्वच्छतेचे महत्व
१३. सामान्य ज्ञानात वाढ
१४. चावडी वाचन व वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यात धीट पणा
१५. बक्षीस योजनेमुळे सहभागी विद्यार्थ्यांमध्ये वाढ

शिक्षकवृंद :

१. सौ. ज्या निंबजी नेरे : मुख्याध्यापक : शिक्षण - एम. ए. (मराठी) एम एड
अध्यापनाचा अनुभव - २४ वर्षे, अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी

२. श्री. नारायण तुकाराम नांद्रे : शिक्षण : श्री.नारायण तुकाराम नांद्रे -बी.ए.डी.एड
केंद्र-तालुका -जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती म्हणून कामे

३. श्री.पंकज भिकन वानखेडे - शिक्षण - एम.ए.डी.एड.
सुंदर फलक लेखन

=====================================================================

# आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
# मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय - यशपाल समिती, भारत सरकार
# 'मराठी शाळांची माहिती' या अभिनव उपक्रमातर्फे आत्तापर्यंतची, शाळा क्रमांक – ५५
# ब्लॉगरची लिंक –

=====================================================================

फोटो -